निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक
गडचिरोली,दि.५:- आगामी विधानसभा निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी वर्गाची आज नियोजन बैठक घेतली. यावेळी विविध पुर्व तयारीबाबत आढावाही घेण्यात आला. विधानसभा निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी आवश्यक सुचना यावेळी त्यांनी दिल्या.
या बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निलठूंबे, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, तहसिलदार एन.एम. ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ,रविंद्र भुयार , सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वि. आ. मोहतुरे , जिल्हा परिषदचे कॉफो विकास सावंत, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ ,व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी विधानसभा निवडणूकीसाठी आवश्यक साहित्य, आवश्यक वाहतूक वाहणे, नोडल अधिकारी संख्या, ईव्हिएम, व्हीव्हीपॅट, तसेच इतर संख्यात्मक माहिती बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. गडचिरोली जिल्हयातील विधानसभा निवडणूक तयारीसाठी ९ व १० सप्टेंबर रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे.





