30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक शिक्षकांना भारताचा संविधान भेट देवून केला शिक्षक दिन साजरा

शिक्षकांना भारताचा संविधान भेट देवून केला शिक्षक दिन साजरा

0
66

गोरेगाव,दि.05 : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार येथे शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंदांकडून शाळेतून दुसºया ठिकाणी बदली झालेल्या व नव्याने रूजू झालेल्या शिक्षकांना शाल, श्रीफळ न देता त्यांना भारताचा संविधान भेट देवून सत्कार करण्यात आला. असा आगळा-वेगळा सत्काराचा उपक्रम गोरेगाव तालुक्यात प्रथमच असल्याचे बोलले जात आहे. या सत्कार उपक्रमाचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा पिंडकेपार येथे शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.पं. सदस्य मनोहर बिसेन हे होते. तर दीप प्रज्वलन म्हणून माजी सरपंच राजेंद्रसिंह राठोड उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरपंच दुलीचंद रहांगडाले, शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष भरत घासले, उपाध्यक्ष खोमेंद्र बिसेन, सदस्य रमेश बिसेन, दुर्योधन पटले, कविता राऊत, प्रमिला साखरे, रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता कंटीलाल कटरे, मेघराज चौधरी, माजी ग्रा.पं. सदस्य दीपक बोपचे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या छायाचित्राचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी डॉ. राधाकृष्णण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतून दुसºया शाळेत बदली होवून गेलेले मुख्याध्यापक यु. पटले, शिक्षक सुभाष सोनवाने व नव्याने रूजू झालेले मुख्याध्यापक पी.डी. पटले, शिक्षक टी. पारधी, शिक्षिका ब्राह्मणकर यांना भारताचा संविधान भेट देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पटले यांनी केले. संचालन मुनेश्वर कटरे यांनी तर आभार शिक्षक युवराज बोपचे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी व ग्रामवासी उपस्थित होते.