गोंदिया,दि.05ः-विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसे राजकारणातही घडामोडी घडू लागल्या आहेत.काँग्रेसकडून दोनवेळा विधानपरिषद व तिनवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर सध्या सुरु असलेल्या भाजपच्या ईव्हीएमलाटेसमोर चांगल्या चांगल्या नेत्यांनाही घाम फुटला आहे.त्यातच गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही लोकसभा निवडणुकीतील 38 हजाराचे मताधिक्य आपल्या पराभवाला कारणीभूत ठरु शकते या भितीने भाजपमध्ये प्रवेशासाठी हवी तेवढी पुर्ण तयारी केलेली आहे.त्यातच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतही संबध चांगले रहावे आणि विधानसभेच्या निवडणुकीत सहकार्य मिळावे या उदिष्ठाला समोर ठेवून आमदार अग्रवाल यांनी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांची मुंबई येथे भेट घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.भाजप सेनेमध्ये युती पक्की झाली असून गोंदियाची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे वृत्त समोर येत आहे.





