सडक अर्जुनी,दि.05ः- राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचार्यांची जुनी पेंशन योजना रद्द करुन नविन परीभाषित अंशदान पेन्शन योजना अमंलात आणणार्या सरकारी धोरणाचा निषेध आज शिक्षक दिनी सडक अर्जुनी तालु्क्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्यावतीने नोंदविण्यात आला.सदर योजना ही कर्मचारी विरोधी असल्याने सातत्याने कर्मचारी संघटना या योजनेचा विरोध करुन जुनीच पेन्शन योजना लागू करण्यासाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत,याचा विचार शासनाने करावा असेही या आंदोलक शिक्षकांनी म्हटले आहे.
जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचार्यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभर 5 सप्टेंबर पासुन काळी फित लावुन कार्यालयात काम करणे, 9 सप्टेंबरला एकदिवसीय संप करणे आणि शासनाने लक्ष दिले नाही तर 11 सप्टेंबर पासुन बेमुदत संप करण्यात येणार आहे. सडक अर्जुनी तालुक्यात शेंडा चौक येथे शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन सदर शासन निर्णयाचा शिक्षकदिनीचचा विरोध केला.याप्रसंगी किशोर डोंगरवार राज्य कार्यकारिणी सदस्य , शिक्षक समिती, पी एन बडोले अध्यक्ष , बाळू वालोदे सरचिटणीस , हुमेन्द्र चांदेवार सचिव जुनी पेन्शन हक्क संघटन , महेश भिवगडे, हेमंत वैद्य, बी के चंदेकर , आरुण वैद्य, अरविंद कापगते , बी एस बोकडे, के एस, बोकडे, जे बी कर्हडे, हेमंत वैद्य, सुरेश आमले, घनश्याम मेश्राम, नरेश मेश्राम, महेश कवरे, पी टी नेवारे , एकनाथ लन्जे, राजु कौटण्गले, राहुल कोनतंवार , भुमेश वदोले, एन ए बड़ोले, एम बी ब्राम्हण्कार, डी एस राऊत, डी पी येरने, पी एस उके, बी जे येरने, डी ए शहारे, आर आर टेंभुरने, ए जी पाटिल, मंगेश मेश्राम, उध्धव शिवणकर , सौ एम बी गहने, सौ ऊ, एम कोसरे, सौ डी डी शहारे, सौ वर्षा मेश्राम , कु आय बी राऊत, कू विजया मेश्राम, मंजूश्री लडि , विशाखा लीचडे, कु डी एस फन्दे, कु बी एस वहाणे, व अनेक पदाधिकारी उपस्थीत होते.





