40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा विद्यार्थ्यांनो धनुर्विद्येत नाव कमवा- डॉ.परिणय फुके

विद्यार्थ्यांनो धनुर्विद्येत नाव कमवा- डॉ.परिणय फुके

0
44

blank

मजितपूर येथे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व सरपंच मेळावा
गोंदिया दि.6 : आदिवासी विद्यार्थी बालवयापासून काटक असतात.त्यांना खेळांमध्ये विशेष रुची असते. त्यांनी खेळांमधून प्रगती करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात
चांगली कामगिरी केली तर त्यांचे भविष्य उज्वल आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी धनुर्विद्येत पारंगत होवून  आपले नाव कमवावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
तालुक्यातील मजितपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व अदानी फाऊडेशन तिरोडा यांच संयुक्त वतीने आयोजित धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व सरपंच
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून डॉ. फुके बोलत होते.  प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, मजितपुरच्या सरपंच नंदिनी आंबेडरे, अदानी फाऊंडेशनचे नितीन सिराळकर, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
धनुर्विद्या हा चांगला खेळ असल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, बालवयापासून काही आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या येते.आदिवासी विकास विभाग आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध 18 प्रकारचे खेळ सुरु केल्यामुळे त्यांना आता खेळाच्या विविध क्षेत्रात नाव कमावता येईल. सरपंच हा गावातून निवडून येत असल्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी आता वाढली आहे.  सरपंचानी गावपातळीवर गावाच्या विकासाचे नियोजन केले पाहिजे. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. गावाच्या विकासामध्ये सर्वोच्च प्राथमिकता पिण्याच्या पाण्याला दिली पाहिजे.त्यानंतर गावातील नाले, रस्ते यासाठी निधीचा वापर केला पाहिजे. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार विजय रहांगडाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी पालकमंत्र्यांनी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले.कार्यक्रमाला अनेक गावातील सरपंच, आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी  मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जवाहर गाढवे यांनी मानले.

blank