30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार

शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार

0
29

तिरोडा,दि.06 : गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी झाल्यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली आहे. जिल्हयातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह अन्य पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजे. पर्यटन क्षेत्रात जिल्हयातील स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याचे नियोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटक म्हणून डॉ. फुके बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. उपेंद्र कोठेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार सर्वश्री भजनदास वैद्य, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.‍ चिंतामण रहांगडाले, उपसभापती विजय डिकवार, जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजित डोंगरे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोरेगाव
नगराध्यक्ष आशिष बारेवार, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे यांची उपस्थिती होती.
आमदार रहांगडाले म्हणाले, शिक्षकांच्या संस्कारामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो असून शिक्षकांची प्रेरणा सातत्याने मिळत आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची देखील सुविधा उपलब्ध होण्यासा मदत झाली आहे. अनेक विकासकामे केल्यामुळे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक आणि प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक, अन्य शिक्षकवर्ग, विद्यार्थी व नागरिक मोठया  संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मदन पटले यांनी मानले.