भंडारा,दि.06ः-पुढील महिन्यात होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत.
नक्षल सेलचे पोलिस निरीक्षक एन.एस. मेश्राम यांची मोहाडीचे ठाणेदार, नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक एल.एम. कानसे यांची नक्षल सेल भंडारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. करडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक एन.एन. उईके यांची साकोली पोलिस ठाणे, साकोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एच.एम. रायपुरे यांची तुमसर पोलिस ठाणे, मोहाडीचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक एन.बी. वाजे यांची करडीचे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भंडारा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गेडाम यांची साकोली पोलिस ठाणे, कारधा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक आर. ए. फटिंग यांची साकोली पोलिस ठाणे, साकोली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डी.ए. डहाके यांची तुमसर पोलिस ठाणे, पवनीच्या पोलिस उपनिरीक्षक ए.एम. फुकट यांची आंधळगाव पोलिस ठाणे, भंडारा पोलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक व्ही.एन. राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखा भंडारा, साकोली येथील उपनिरीक्षक आर. डब्ल्यू. रेवतकर यांची कारधा पोलिस ठाणे, आंधळगावचे उपनिरीक्षक डी.बी. इंगळे यांची भंडारा पोलिस ठाणे, तुमसरचे उपनिरीक्षक जटाळ यांची भंडारा पोलिस ठाणे, कारधा येथील परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक म्हैसकर यांची लाखनी पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक एस.आर. लांजेवार यांची पवनी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तसेच केंद्रीय निवडणूक आयोग व पोलिस महासंचालकांनी पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांबाबत दिलेल्या निर्देशानुसार सदर बदल्या पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केल्या आहेत.





