25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन

0
38

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.08ः – ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला. त्यांनी एस. सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या 17 व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले.

राम जेठमलानी यांनी ‘या’ व्यक्तींसाठी केलीय वकिली!

– माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांची बाजू न्यायालयात मांडली.

– दिल्लीतील उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला.

– जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची न्यायालयात बाजू मांडली.

–  16 वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला.

– लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली.

– सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले.

– 2 जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली.

– शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली. याचबरोबर, हाजी मस्तान आणि केतन पारेख यांची सुद्धा त्यांनी वकिली केली.

– कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात त्यांची बाजू मांडली.

– चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.

– केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांनी या प्रकरणात बाजू मांडली. मात्र, नंतर याप्रकरणातून त्यांनी माघार घेतली.