36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीची शिवस्वराज यात्रा उद्या गोंदिया-भंडार्‍यात

राष्ट्रवादीची शिवस्वराज यात्रा उद्या गोंदिया-भंडार्‍यात

0
44

blank

गोंदिया/भंडारा,दि.09ः-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीद्वारे राज्याच्या दौर्‍यावर निघालेली शिवस्वराज यात्रा १0 सप्टेंबर रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात येथे येत आहे. या यात्रेत खा. प्रफुल पटेल, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी व अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील.
शिव स्वराज यात्रा सकाळी नागपूरवरून प्रारंभ होऊन गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करेल.सकाळी 11 वाजता सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादीचे नेते जाहिर सभेला सबोंधित केल्यानंतर ही यात्रा गोंदिया मार्गे तिरोडा येथे दुपारी 2 वाजता पोचेल.त्याठिकाणी सभेला संबोधित केल्यानंतर ही यात्रा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मातोश्री सभागृहात संध्याकाळी ५ वाजता व रात्री ७.३0 वाजता भंडारा येथील मुस्लीम लायब्ररी हॉलमध्ये आयोजित जाहीर सभा होणार आहे. शिव स्वराज यात्रेसाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली. या सभांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे,गोंदिया जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व आघाडीच्या अध्यक्षांनी केले आहे.

blank