प्राथमिक शिक्षण विभागात व्दिशिक्षकी प्रथम शाळा ठरण्याचा मिळाला मान- मुख्याध्यापक दिलीप वाघमारे, बाबरवस्ती
सांगली,दि.08ः जिल्हा परिषदेच्या पांडोझरी येथील जळवच खडखाळ माळरानातील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता व व्यवस्थापनाचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. असे मानांकन मिळविणारी प्राथमिक शिक्षण विभागातील बाबरवस्ती ही व्दिशिक्षकी शाळा जत तालुक्यातील पहिलीच शाळा ठरली आहे.सध्याच्या जागतीकीकरणाच्या युगात स्पर्धा परवलीचा शब्द बाला आहे. या युगात शाळामंध्ये गुणवत्तेबरोबर व्यवस्थापन अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. अशा परीस्थितीत जिल्हा परिषद शाळा या स्पर्धेत तग धरून राहण्याकरीता प्रयत करीत आहेत. अशा परीस्थितीत जत सारख्या दुष्काळी व दुर्गम तालुक्यातील शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने यासाठी प्रयत करीत आयएसओसाठी नोंदणी केली. त्या करिता लागणारे सर्व निकष पूर्ण करण्याचे आव्हान गेली नऊ वर्ष पासून सतत धडपड करुन व सर्वांनी योगदान देत शाळा नकाशावर आणण्याचा केलेला प्रयत्न अधिक कौतुकास्पद आहे. या काळात शाळेने कात टाकली आहे.
आय.एस.ओ. करीत असताना शाळेत ग्रामस्थांच्या आर्थिक योगदानातून अधिक भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. त्यात शाळेत झाडाच्या बाजूने पूर्ण चरीचे कपांऊड करणे, इमारतीची रंगरंगोटी, शाळेचा परीसर अधिक शैक्षणिकदृष्टया अपयुक्त करणे, मुलांसाठी पिण्याची पाण्याची सुविधा, शालेय दप्तर व व्यवस्थापन याबाबत विशेष नियोजन, प्रत्येक वर्गासाठी चप्पल स्टँड, शाळेच्या परीसरात कुंडया, प्रत्येक झाडाचे नामफलक, शाळेच्या परीसरातील सुविधा दर्शक फलक, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन, शालेय पोषण आहार सुविधा, कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करण्यात आले. शाळेचे कामकाज पूर्ण संगणकीकृत करण्यावर भर देण्यात आला आहे. ई-लर्निंगसाठी विशेष प्रयत्न करण्याबरोबर पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या उद्दीष्टे व राष्ट्रीय अभ्यासक्रमाने सूचित केलेल्या तत्वावंर आधारित शिक्षण प्रक्रिया या निमित्ताने अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्या करिता वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. असा शाळेचा परीसर अधिक प्रयोगात आणून मुलामंध्ये जागृती घडविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 
लोकसहभागातून मॉडेल शाळा
यानिमित्ताने लोकसहभागातून मॉडेल शाळा विकसीत करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी बोलून दाखविला. सर्वोत्तम शाळा निर्माण करण्याच्या संकल्पात शालेय व्यवस्थापन समिती, ग्रांमपचायत, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक, पंचायत समिती यांचे विशेष योगदान मिळाले आहे. या कामी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी केलेले सहकार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे हे मानांकन मिळण्यास मदत झाल्याचे दिलीप वाघमारे यांनी सांगितले. या कामी शालेय स्तरावर आय.एस.ओ. साठी कार्यवाहीची जबाबदारी व नियोजित अभ्यासक्रम व पुनर्रचना समिती सदस्य बाबू मोटे यांनी पार पाडली. अमोल शिंदे,अनिल पाटील, यांनी मार्गदर्शन केले. यासाठी प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले.
आभिजित राऊतची प्रेरणा..
मागील वर्षभरापासून मुख्य कार्यकारी अधिकारी आभिजित राऊत यांनी राबविण्यास सुरवात केलेल्या माझी शाळा अभियानाच्या माध्यमातून सर्व बदल होत आहेत. त्यामुळे विविध उपक्रम राबविताना वेगवेगळ्या कल्पना सहजपणे सुचत गेल्या होत्या. त्यात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला तर आपणास वेगळ्या वाटेने जाता येईल, असे वाटल्याने आय.एस.ओ. ची कल्पना पुढे आली. म्हणून हे सारे यश मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत सरांच्या उपक्रमाला जाते. त्याचबरोबर शाळेचे काम पाहून आयएसओसाठी प्रयत्न झाले. हे मानांकन प्रदाकरताच मुख्याध्यापक , सर्व , पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. शैक्षणिक क्रांतीसाठी शाळा सज्ज झाली आहे, असा विश्वास मुख्याध्यापक दिलीप वाघमारे व्यक्त केला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्षा सविता बाबु मोटे,उपाध्यक्षा ललिता प्रकाश बाबर, सरपंच जिजाबाई कांबळे ,उपसरपंच नामदेव पुजारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,मातापालक,शिक्षक पालक,माजी.जि.प.अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,यांनी आय एस. ओ.मानांकनासाठी कष्ट घेतले. जत पंचायत समितीचे सभापती सुशिला तावशी,उपसभापती आडव्याप्पा घेरडी,मनोज जगताप पंचायत समिती सदस्य , तमण्णागौडा रवि पाटील शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सांगली,तमन्नगोंडा ,सरदार पाटील जि.प. सदस्य सांगली,गटविकास अधिकारी डी.बी.खरात,गटशिक्षणाधिकारी बी.एम. जगधने,शिक्षण विस्तार आर.डी.शिंदे,केंद्र प्रमुख रमेश राठोड,रामचंद्र राठोड,सर्व पं.स.सदस्य ,जि.प.सदस्य ,पालक ,ग्रामस्त,सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. न करणाऱ्या पथकामध्ये अग्रणी परिक्षक एस.व्ही. चौधरी आदींचा समावेश होता. पथकाने आयएसओ मानांकन जाहीरा अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने काम सोपे झाले असल्याची भावना शिक्षक दिलीप वाघमारे बोलून दाखविली.




