
गोंदिया,दि.09 : नायक पोलिस शिपाई गजानन रामचंद्र ठाकरे यांचे काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. यामुळे संचालक विमा संचालनालय, मुंबई यांच्याकडून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत नामनिर्देशित व्यक्ती लाभधारक म्हणून त्यांची पत्नी मीनाक्षी यांना विमा दाव्याची रक्कम १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन पोलिस निरीक्षक सुधीर घोनमोडे यांनी केले.





