
गोंदिया,दि.09ः येत्या एक दोन दिवसात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षामध्ये पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुक रिंगणात बसपकडून उभ्या राहिलेल्या डाॅ.विजया नंदुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.त्यानंतर बसपमध्ये दोन्ही जिल्ह्यात चांगलीच चलबिचल सुरु झाली असून गोंदिया जिल्ह्यातही बसपमध्ये भगदाड पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बसपमधून कोण बाहेर पडतो आणि कुठल्या पक्षात जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




