26.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध; काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी

जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध; काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी

0
9

गोंदिया— महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

आज गोंदिया येथील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार श्री प्रफुल पटेलजी व खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या निर्देशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवून “सार्वजनिक माफी मागा” आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. राजलक्ष्मी तुरकर म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कदापिही खपवून घेतला जाणार नाही. आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य हा केवळ त्यांचा नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे. शिव, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान हीच खरी संस्कृती आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व महिलांची जाहीर व सार्वजनिक माफी मागावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.