आमगाव,दि.13 :तालुक्यातील अंजोरा जि.प.क्षेत्रांतर्गत येणार्या आसोली येथील कोसमटोला ते मक्कीटोला या रस्त्यादरम्यान कोसमटोला पासून १ किमी. अंतरावर गरीबलाल बोपचे यांच्या शेताजवळ एका मोठ्या पुलाचे बांधकाम मागील वर्षी करण्यात आले होते. परंतू कंत्राटदाराने सदर पुलाचे बांधकाम निकृष्ठ साहित्याचा वापर करून काम केले असल्याने मार्गावर खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाNया प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या मार्गावर वाहणे जाण्यास अडचण होत आहे. या बाबीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष नाही. या पुलाचे बांधकाम करतांना वंâत्राटदाराने
अंदाजपत्रकानुसार आवश्यक त्या साहित्याचा वापर केला नाही. सिमेंट पाईप टावूâन फक्त मातीने भरगच्च भरलेला दिसून येतो.त्यामुळे त्या ठिकाणाहून वाहने काढत असतांना वाहन चालकांच्या
जीवाला धोका निर्माण झाला आहे. मोटार वाहन व इतर वाहन या ठिकाणाहून काढत असतांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे ठिकाण अपघाताला आमंत्रण देत आहे. याकडे कोणाचेही
लक्ष नाही. शासन व प्रशासन गाढ झोपेत आहे. त्यामुळे हे ठिकाण पुढे मोठ्या दुर्घटनेला आवाहन देत आहे.





