27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक जिल्हा परिषद शाळा दहिवडीचे लोकनृत्य स्पर्धेत यश;तासगाव तालुक्यात प्रथम

जिल्हा परिषद शाळा दहिवडीचे लोकनृत्य स्पर्धेत यश;तासगाव तालुक्यात प्रथम

0
50

तासगाव,दि१5; सांगली जिल्हा परिषद सांगली अंतर्गत जिल्हा परिषद स्विय निधीतून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. सन 2019-20 या चालू वर्षी दहिवडी जिल्हा परिषद शाळा ही तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली आहे.या सहशालेय विविध स्पर्धा अंतर्गत नुकत्याच दिनांक अकरा सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा पंचायत समिती तासगावच्या सभागृहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये लहान गट व मोठ्या गटातून संपूर्ण तालुक्यातून स्पर्धक आले होते. या स्पर्धेमध्ये लहान गटातून जिल्हा परिषद शाळा दहिवडी या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मार्गदर्शक शिक्षक या लोकनृत्य स्पर्धांसाठी गौरी बेटगेरी, मच्छिंद्रनाथ कांबळे, रेवणसिद्ध होनमोरे, लक्ष्मण शिंदे,एन डी पाटील,अजय काळे यांनी प्रयत्न केले त्यांना मुख्याध्यापक राजेंद्र कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.तासगाव पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई माळी,शिक्षण विस्तार अधिकारी शेंडगे, शामल माळी , प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत लोकनृत्य स्पर्धेतील विजेत्या संघाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे दहिवडीचे ग्रामस्थ,ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.