30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ अनिमियामुक्त आणि कुपोषणमुक्त गडचिरोलीसाठी पोषण पदयात्रा 

अनिमियामुक्त आणि कुपोषणमुक्त गडचिरोलीसाठी पोषण पदयात्रा 

0
70
गडचिरोली,दि.15: केंद्र शासनातर्फे समग्र पोषणावर आधारित  पोषण अभियान कार्यक्रम चालवला जात आहे. त्यामध्ये सप्टेंबर महिना *पोषण माह* म्हणून साजरा केला जातोय. यात संपूर्ण महिन्याभरात अंगणवाडी, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन, समाजात जाणीवजागृती करणे, अभियानात लोकांचा सहभाग वाढवणे यासाठी प्रयत्न केले जाता आहेत. याच पोषण अभियानाचा एक भाग म्हणून आणि कुपोषणमुक्त व अनिमियामुक्त गडचिरोलीचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी गडचिरोली मध्ये पोषण वॉक आयोजित करण्यात आला आहे.
 या पोषण वॉक मध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी, तसेच महाविद्यालयीन युवक सहभागी होणार आहेत.
     सदर पोषण वॉक इंदिरा चौक, गडचिरोली ते कृषी महाविद्यालय, सोनपूर, गडचिरोली या मार्गावर दि 17 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 7:30 वाजता आयोजित केला आहे. तरी सर्व नागरिकांना सदर पोषण पदयात्रेत सहभागी होण्याकरिता आव्हान करण्यात येत आहे. मंगळवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वा. इंदिरा चौक येथे कार्यक्रमाला सुरुवात होणार असून 8:00 वा. चालण्यास सुरवात होणार आहे. त्यानंतर 9 ते 9:30 दरम्यान मान्यवरांच्या मार्गदर्शनाने पदयात्रेचा समारोप केला जाणार आहे.पदयात्रेत सहभागी लोकांसाठी यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.