30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळ्याचे रविवारी मालेगाव येथे आयोजन

बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळ्याचे रविवारी मालेगाव येथे आयोजन

0
39
  • कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

वाशिमदि. १5 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळ्याचे १५ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजता मालेगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. महामंडळात नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचचे वाटप केले जाणार आहे.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार भावना गवळी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्य शिक्षण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, मालेगावच्या नगराध्यक्ष रेखा अरुण बळी यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चुं. श्रीरंगम, अपर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे, सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे. गुल्हाने यांची उपस्थिती राहणार आहे.

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरव नालिंदे यांनी केले आहे.