30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील ग्रामसेवक कामावर परतले..

जिल्ह्यातील ग्रामसेवक कामावर परतले..

0
28

गोंदिया,दि.16ः-आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी वारंवार सरकारशी निवेदने देऊन चर्चा करून ही मार्ग निघत नसल्यामुळे सरते शेवटी राज्य युनियनने संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन  22 ऑगस्ट पासून सुरू केले होते. गोंदिया जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांचे नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.शासनाने या आंदोलनाची दखल घेत ना. पंकजाताई मुंडे व प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या समवेत सकारात्मक चर्चेत सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्यात आले. त्यात पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, विस्तार अधिकारी पदे वाढविणे, विस्तार अधिकारी पदे ग्रा वी अ मधुन पदोन्नती ने भरने, प्रवास भत्ता 1500 करने, अतिरिक्त कामे कमी करने, अनियमितता प्रकरणी फौजदारी गुन्हा आदेश रद्द करणे, पदवीधर शैक्षणिक अहर्ता करणे या मागण्या तत्वतः मान्य केले असून येत्या तीन महिन्यांत सर्व मागण्यांचे शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रधान सचिव यांनी जबाबदारी घेतल्यामुळे  राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजीव निकम, संयुक्त सचिव सचिन वाटकर, विभागीय सचिव कमलेश बिसेन व ईतर राज्य पदाधिकारी यांनी दिनांक 13 सप्टेंबर पासून आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक कामावर परत आले असून आंदोलन काळातील सर्व प्रलंबित कामे अतिरिक्त काम करून पूर्ण केले जातील असे आश्वासन निवेदन द्वारे संघटनेने दिलेले आहे. सदर निवेदन गोंदिया जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांना देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, जिल्हा अध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटिंग, कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे, संघटक रामेश्वर जमाईवार उपस्थित होते.