37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मग्रारोहयोतील कंत्राटी कर्मचाèयांच्या बदल्या होणार-जिल्हाधिकारी

मग्रारोहयोतील कंत्राटी कर्मचाèयांच्या बदल्या होणार-जिल्हाधिकारी

0
33

गोंदिया,दि.१७ः-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाèयांच्या राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या तक्रारीचे स्वरुप बघता ज्या पंचायत समितीमध्ये qकवा एका विशिष्ट ठिकाणी अधिक कालावधी झाला असेल त्या ठिकाणाहून त्यांचे नियुक्तीचे ठिकणा बदलविण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले होते.त्या अनुषंगानेच नागपूर विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी १३ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या पत्रानुसार गोंदिया जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांनी १६ सप्टेंबरला बैठक घेत एकाच ठिकाणी अधिक कार्यकाळ झालेले व तक्रारी असलेल्यां मग्रारोहयोतील कंत्राटी कर्मचाèयांच्या तत्काल बदल्या करण्याचे निर्देश मग्रारोहयो उपजिल्हाधिकारी यांना दिल्याने येत्या काही दिवसात गोंदिया जिल्ह्यातील मग्रारोहयो मध्ये काम करणाèया कंत्राटी कर्मचाèयांच्या पंचायत समितीमध्ये बदल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे आजपर्यंत या बदल्या थांबल्या होत्या,मात्र जिल्हाधिकारी यांनी स्वत लक्ष घातल्याने यावेळी बदल्या होतील अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

blank