अर्जुनी मोर,दि.17ः-राज्यातील भाजपाचे शासन लोकाभिमुख आहे. राज्यातील जनतेला लाभ पोहोचविणार्या अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत असून राज्यातील वृद्ध कलावंतांनांच्या मानधनात व लाभार्थी निवडीच्या संख्येत वाढ केली आहे. जिल्ह्यात आता १00 कलावंतांची निवड होणार असून त्यांना प्रत्येकी २ हजार २५0 रुपये मानधन मिळणार आहेत. उमेदचे ग्रामसंघ गावागावात तयार झाल्याने त्यांना सभा घेण्यासाठी कार्यालयीन इमारत बांधून देण्याचा विचार सुरु असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री व आ. राजकुमार बडोले यांनी केले.
ते गोठणगाव जिल्हा परिषद तील झांसी नगर पंचायत समिती क्षेत्रातील तेरा गावात २ कोटी ७८ लाखाच्या बत्तीस विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य रचना गाहाणे, केवळ राम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, नमूदेव नागपुरे, गुरुदेव चांदेवार, होमदास पुस्तोडे, सी.बी. टेंभुर्णे, संजय खरवडे, व्यंकट खोब्रागडे, दलित भोयर, विनोद नाकाडे ,सरपंच माधुरी चांदेवार, भोजू लोगडे, लैलेश शिवणकर, विजय अरोरा व सर्व गावातील सरपंच व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दलित वस्ती पंचवीस पंधरा प्रधानमंत्री सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर व कार्यारंभ आदेश प्राप्त झालेल्या गोठणगाव जिल्हा परिषद अंतर्गत यासी नगर पंचायत समिती क्षेत्रातील झांसी नगर येथे बुद्धविहार आवार भिंत पाच लक्ष, सभामंडप बांधकाम सात लक्ष, ब्रिजचे बांधकाम पंधरा लक्ष, स्मशानभुमी रस्ता सात लक्ष, पवनी धाबे येथे बुद्धविहार आवार भिंत पाच लक्ष, सिमेंट रस्ता तीन लक्ष, सिमेंट नाली तीन लक्ष, रामपुरी येथे सिमेंट नाली बांधकाम पाच लक्ष, सभागृह बांधकाम पाच लक्ष, एलोडी जांभळी येथे सिमेंट नाली पाच लक्ष, सभागृह बांधकाम पाच लक्ष, तिडका येथे जोड रस्त्याचे नूतनीकरण १७ लक्ष, माता माऊलीचा चावडी बांधकाम तीन लक्ष, एरंडी र्दे प्रवेश द्वार ३ लक्ष, जब्बार खेडा सभामंडप चार लक्ष, सिमेंट नाली ३ लक्ष, कानोली येथे जोडरस्ता नूतनीकरण एक कोटी २५ लक्ष, प्रवासी निवारा तीन लक्ष, सभागृह बांधकाम तीन लक्ष, नाग मंदिर सभागृह चार लक्ष, कोहलगाव बुद्धविहार आवार भिंत पाच लक्ष, बिरसा मुंडा सभागृह चार लक्ष, माता माऊली सभागृह तीन लक्ष, दुर्गा पहाडी सभागृह पाच लक्ष, चालना कोडका सिमेंट रस्ता चार लक्ष, बुद्ध विहार सभामंडप दोन लक्ष पन्नास हजार, जिल्हा परिषद शाळा आवार भिंत दोन लक्ष पन्नास हजार, परसोडी रयत जिल्हा परिषद शाळेला आवार भिंत चार लक्ष, हनुमान मंदिर आवार भिंत चार लक्ष, पांढरवाणी रयत सिमेंट नाली तीन लक्ष, शिव मंदिर सभामंडप तीन लक्ष, नाट्यगृह तीन लक्ष, अशा एकूण तेरा गावात २ कोटी ७८ लाखाच्या बत्तीस कामाचे भूमिपूजन आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावागावातील महिला-पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




