गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.18ः- येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसqहता लागणार आहे,त्यापुर्वी राज्यात राजकीय नेत्यांचे पक्ष बदलाचे वारे सुरु आहेत.सत्तेच्या दिशेने नेहमीच नेता असो की कार्यकर्ता हा राहिलेला आहे.त्यातच गेल्या २५ वर्षापासून लोकप्रतिनिधीम्हणून सातत्याने गोंदिया विधानसभा मतदारसंघासोबतच विधानपरिषदेत राहिलेले काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पक्ष बदल्याच्या चर्चेने मात्र गोंदिया विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.भाजपच्या कार्यकत्र्यांसह पदाधिकाèयांनी केलेल्या विरोधााचा आणि सामुहिक राजीनामा देण्याचे केलेले सुतोवाच याचा प्रभाव आ.अग्रवालांच्या पक्षप्रवेशासह भाजपच्या वरिष्ठ नेते कशापध्दतीने हाताळतात याकडे लक्ष लागले आहे.तर दुसरीकडे गेल्या २० वर्षापासून गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकारानेच सत्तेत राहणाèया भाजपला त्यावेळी का विरोध आठवला नाही,आत्ताच त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी का अशा प्रश्न आता सोशल मिडियासह सर्व सामान्य नागरिकही विचारू लागले आहेत.जर सत्तेसाठी जिल्हापरिषदेत तुम्हाला आमदार अग्रवाल चालले तर राज्यातील सत्तेच्या सहभागात त्यांच्या विरोध का असा ही प्रश्न एक गट उपस्थित करु लागला आहे.सोबतच ते अद्याप पक्षात आलेले नाहीत,त्यामुळे आम्ही खुल्या स्वरुपात त्यांचा विरोध कसा करायचा असे म्हणत पक्षश्रेष्ठीं जो निर्णय घेतात त्याप्रमाणेच आजपर्यंत आम्ही काम केले आहे,त्यामुळे आम्ही पक्षासाठी काम करणारे असा म्हणणाराही एक वर्ग भाजपमध्ये दिसून येत असल्याने आ.अग्रवालांच्या भाजपप्रवेशाच्या राजकारणावर भाजपमध्येच दुफळी दिसून येत आहे.वास्तविक राजकारणाचा विचार केल्यास सध्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून जे विधानपरिषदेवर निवडून गेले,त्या विजयातही आमदार गोपालदास अग्रवाल यांचाच वाटा महत्वाचा ठरला आहे.आ.अग्रवाल आपले सुपुत्र प्रफुल अग्रवालला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले नसते तर फुके हे या विधानपरिषदेच्या जागेवर निवडूनच आले नसते.त्यावेळी भाजपने मात्र आ.अग्रवालांची साथ का स्विकारली असाही प्रश्न उपस्थित केला जा आहे.
अशा सर्व परिस्थितीत आमदार अग्रवालांच्या भाजप प्रवेशाला जाहिर विरोध करण्यासाठी गेल्या काही महिन्यापुर्वी सुध्दा येथील पोवार बोर्डींगमध्ये भाजपने सभा घेतली होती.त्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी मात्र त्या विरोधाला दुर्लक्ष करीत अग्रवालांच्या प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे बोलले जात आहे.आत्ता दोन चार दिवसात आचारसqहताच लागू होणार असल्याने आणि काँग्रेसमध्ये राहून आणि काँग्रेसच्या काळात सत्तेतील आमदार राहूनही त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी यावेळी सत्तेची पाऊले ओळखत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील त्यांना राजकारणात नेहमीच वरदस्त देणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन महिन्यापुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने आ.अग्रवाल सुध्दा जातील हे तेव्हापासूनच निश्चित झाले होते.आता त्यावर जवळपास शिक्कामोर्तंबच रविवारच्या प्रताप लॉनच्या बैठकीत झाले आहे.आमदार अग्रवाल भाजपमध्ये आल्यास २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात राहून पराभूत झालेले विनोद अग्रवाल यांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.पराभूत झाल्यानंतरही त्यांनी विनोद अग्रवाल यांनी मतदारसंघातील भाजप मतदार व कार्यकत्र्यंांना व्यवस्थित आपल्यासोबत टिकवून ठेवण्याचे काम केले आहे.भाजप लोकप्रतिनिधींच्या निधीतील कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात पक्ष बळकटीचे काम केले हे पक्षालाही नव्हे तर कुणीही विसरु शकत नाही.त्यामुळे साहजिकच आम.अग्रवालांच्या भाजप प्रवेशाने पहिला फटका बसेल तो परिश्रम घेणाèया विनोद अग्रवालांना यात शंका नाहीच.त्यासोबतच आमदारकीच्या रांगेत असलेले रमेश कुथे,नेतराम कटरे,अशोक इंगळे आदीनांही त्याचा फटका बसणार आहे.त्यामुळेच की काय आज मंगळवारला येथील जलाराम लॉनमध्ये भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष छत्रपाल तुरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत आमदार अग्रवालांना पक्षात प्रवेश दिल्यास पक्षाचे सर्व पदाधिकारी,सरपंच,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य राजीनामा देणार अशी भूमिका घेतल्याचे सोशल मिडियातून प्रसारित करु लागले आहेत.त्यामुळे आमदार अग्रवालांच्या भाजप प्रवेशाला आत्ता जोरदार विरोधाचे स्वरुप मिळाले आहे.त्यातही आमदार अग्रवालांनी अद्यापही प्रवेशाची भूमिका स्पष्ट न केल्याने काँग्रेस व भाजपमध्येही ते तळ्यात व मळ्यातच दिसून येत असल्याने त्याचा फटकाही त्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.




