30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ लोकसहभागातून ‘प्लास्टिक मुक्त भंडारा’ करण्यासाठी कटिबद्ध -खा. सुनील मेंढे

लोकसहभागातून ‘प्लास्टिक मुक्त भंडारा’ करण्यासाठी कटिबद्ध -खा. सुनील मेंढे

0
44

भंडारा,दि.18ःपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून केलेल्या ‘प्लास्टिक मुक्त’ भारताच्या निर्मितीसाठी सर्वांना कटिबद्ध होण्याचे आवाहन केले होते. त्यालाच अनुसरून स्थानिक प्रशासन, नागरिक, स्वयंसेवी संस्था, प्लास्टिक विक्रेते, ग्राहक या सर्वांच्या सहभागातून आपले भंडारा शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष खा. सुनील मेंढे यांनी भंडारा नगरपरिषद येथे आयोजित ‘प्लास्टिक मुक्त भंडारा’जनजागृती कार्यशाळेदरम्यान केले.
कार्यशाळेला उपाध्यक्ष आशू गोंडाणे, मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ढेरे, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्लास्टिक मुक्तीसाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाला नगर परिषदेतर्फे कापडी पिशवी देण्यात येईल तसेच या कामी महिला बचत गटांची मदत घेण्याचे नमूद करतानाच खासदार मेंढे पुढे म्हणाले, सिंगल युज प्लास्टिक गोळा करण्यासाठी प्रत्येक प्रभागात रचना लावली जाणार असून प्लास्टिक मुक्त अभियान करण्यासाठी नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी सहकार्य करावे. कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळतर्फे प्लास्टिकला पर्याय असणारे कापडी पिशवी, कागदी बॅगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच यासंबंधी उपस्थितांमध्ये असलेल्या अनेक शंकांचे निरासन देखील करण्यात आले.