गोरेगाव,दि.18ः- महाराष्ट्र विकास सेवे मधिल सहाय्यक गटविकास अधिकारी गट ब यांना पदोन्नती देत गट अ संवर्गात नियुक्त करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने 17 सप्टेंबरला घेतला.त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गट अ गटविकास अधिकारी (बीडीओ) पदावर गोंदिया पंचायत समितीमधील कार्यरत गट ब मधील सहाय्यक गटविकास अधिकारी झेड.टी.टेंभरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यानुसार टेंभरे यांनी आज बुधवारला मध्यानंतर गोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची सुत्रे प्रभारी गटविकास अधिकारी निर्वाण यांच्याकडून स्विकारली.त्यावेळी टेंभरे यांचे पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत गेले.
तर सालेकसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर सडक अर्जुनी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिाकरी एस.टी.तुरकर यांची नियुक्ती करण्यात आली.अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी तेथेच कार्यरत असलेले सहायक गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





