37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ एलईडीने जगमगणार गोरेगाव शहर- आशिष बारेवार

एलईडीने जगमगणार गोरेगाव शहर- आशिष बारेवार

0
30

blank

गोरेगाव दि.18ः: नगर पंचायत गोरेगाव अंतर्गत सर्व सीएफएल दिव्यांमध्ये बदल करून एलईडी लाईट लावण्यात येत आहे. या कामाला ९ सप्टेंबरपासून सुरवात करण्यात आली आहे. यामुळे विजेचा बिलात ४0 टक्क्याने घट होणार असून चांगला प्रकाश मिळणार आहे. अशी माहिती नगर पंचायतीचे अध्यक्ष आशिष बारेवार यांनी दिली. ते प्रभाग १७ येथे एलईडी लाईट बसविण्याचा कामाप्रसंगी नागरिकांना माहिती देतांना बोलत होते.
पुढे त्यांनी सांगितले की ईईएसएलच्या माध्यमातून शहरात १५00 च्या जवळपास एलईडी लाईट लावण्यात येणार आहेत. शहरात २४0 नवीन पोल लावण्यात येणार असून यात शहरातील मुख्य मार्ग व ज्या भागात विशेष गरज आहे याचा समावेश आहे. सोबतच आमदार विजय रहांगडाले यांच्या निधीतून शहरातील ३ ठिकाणी सोलर हाईमास्ट लाईट लावण्यात येणार आहेत. पथदिव्यांचा सुव्यवस्थेसाठी अनेक ठिकाणी सर्कीट ब्रेकर बसविण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी हर्षला राणे, उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, सभापति, नगरसेविका सायाबाई मारबदे व वॉर्डातील नागरिक सुरी साखरे, उदाराम ठवरे, अनिल राऊत, खडके आदी उपस्थित होते. कामाची प्रगती बघून नागरिकांनी आनंद व्यक्त केले.

blank