27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ घटेगाव ग्रामपंचायत ईमारतीचे निकृष्ट बांधकाम

घटेगाव ग्रामपंचायत ईमारतीचे निकृष्ट बांधकाम

0
76

सडक अर्जुनी,दि.19ः-तालुक्यातील घटेगाव ग्रामपंचायत मागील २0 ते २५ वर्षांपासून अस्तित्वात आहे. या ग्रामपंचायतची ईमारत १0 वर्षांपासून जीर्ण झाली होती. १0 वर्षापासून ग्रापंचा कारभार भाड्याचे इमारतीत चालत होते. परंतु सन २0१७-१८ मध्ये जि.प. बांधकाम विभाग व पं.स. सडक अज्रुनी बाणि ग्रापंचे संयुक्त प्रयत्नाने नवीन इमारत मंजूर झाली. मात्र, या नवीन इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. तसेच गावात दुसरी जागा असतांना सुद्धा नाल्याच्या काठावर नवीन इमारत तयार करण्यात आली. निकृष्ठ दर्जाचे बांधकामामुळे पहिल्याच पावसात ग्रामपंचायतची इमारत गळत असून या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामवासी करीत आहे.
सन २0१७-१८ मध्ये मंजूर झालेल्या ग्रामपंचायतची नवीन इमारत घटेगाव-गिरोला मार्गावरील वाहत असलेल्या चुलबंद नाल्याचा काठावर बांधण्यात आली. वास्तविक घटेगाव-गिरोला मार्गावरील दक्षीण दिशेला असलेल्या मोकळय़ा जागेत आरोग्य उपकेंद्र तयार करण्यात आले. त्याच जागेला लागून मोकळी जागा आहे. त्या जागेवर ग्रापंची नवीन अमारत बांधायला पाहिजे होती. परंतु, याला गावातील काही लोकांनी विरोध केला. त्यामुळे चुलबंद नाल्याच्या काठावर ग्रामपंचायतचे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. पांढरी जि.प. क्षेत्राच्या जि.प. सदस्या शिलाताई चव्हाण ह्या घटेगावच्या रहिवासी असून त्यांचे या गावात घर आहे. ग्रापंच्या नवीन इमारतीसाठी गावात मोक्याची जागा असूनही नाल्याच्या काठावर बांधकाम करण्यास शिला चव्हाण यांनी विरोध केला नाही. मागील ८ महिन्यांपासून ग्रापं कार्यालयाचे कारभार नवीन इमारतीत चालत आहे. परंतु, पहिल्याच पावसात इमारत गळत असून या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केले आहे. या बांधकामात याच नाल्याची मातीमिश्रीत रेती बांधकामात वापरलयाने इमारत गळत आहे. अशी घटेगाववासीय ओरड करीत आहेत. या इमारतीमध्ये ऑपरेटर कक्ष, ग्रामसेवक कक्ष, स्टॉफ रूम व सरपंच कक्ष अशा चार रूम असून या इमारतीला कोणत्याच प्रकारच्या खिडक्या नाहीत. वर दिलेल्या खिडक्यांना सज्जे न देता स्लॅबला लागून खिडकी मधून आत पाणी येते. त्यामुळे रूम व हॉल मध्ये बसता येत नाही. संगणकाची रूम लहान असल्याने सरळ पाणी संगणकावर व केबलवर गळत आहे. सरपंच कक्ष मध्ये आत सज्जावर ठेवलेले रजिस्टर पाण्याने ओले होवून त्यावर बुरशी चढली आहे.
सदर इमारत अशा ठिकाणी बांधण्यात आली की, इमारतीच्या तीन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य व झाडे-झुडपे आहेत. झालेल्या बांधकामाच्या सुरूवातीपासून बांधकाम पूर्ण होत पर्यंत पं.स. व जि.प. स्तरावरील अधिकारी फिरकत नसल्याने अशा प्रकारे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करून कंत्राटदाराने सरळ बांधकामाची फोटो दाखवून बिल उचल केल्याचे बोलल्या जात आहे. कंत्राटदाराने सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने या कामात भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. या बांधकामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी घटेगाववासीयांनी केली आहे.