गोंदिया,दि.21 : लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल द्वारा आयोजित आंतरशालेय स्पध्रेचे आयोजन स्टार इंटरनॅशनल शाळेत करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील जवळपास ८२ संघानी सहभाग घेतला होता. प्रथम चरणाच्या निवड प्रक्रियेत २0 संघाची निवड करण्यात आली. ज्योमध्ये प्रोग्रेसिव्ह शाळेच्या संघानी आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
या स्पध्रेत विविध प्रकारच्या फेर्या जसे की, मल्टीपल चॉइस राऊंड, रॅपीड फायर, ऑडीओ वीडीओ राऊंड, बझर राऊंड यामध्ये प्रोग्रेसिव्हच्या विद्यार्थ्यांनी क्विझ मास्टरच्या प्रश्नांची उत्तरे देवून अंतिम फेरी वर्ग १0 वीचे हर्ष बोहरे, वर्ग ९ ची सृष्टी मेर्शाम व वर्ग ८ चे ओम बिरनवार यांनी द्वितीय स्थान प्राप्त करून रूपये ४१00 रोख बक्षीस मिळविले. तसेच वर्ग १0 वीचे निखील बिसेन, वर्ग ९ वीचे आयश बंसोडे व वर्ग ८ वीची विद्यार्थीनी श्रेया लांजेवार यांच्या संघानी उत्कृष्ठ प्रतिभेचे प्रदर्शन करीत स्पध्रेत तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, उपाध्यक्ष अलका कटकवार, सचिव डॉ. नीरज कटकवार, सहसचिव पद्मा कटकवार, कोषाध्यक्ष ज्योती पहिरे, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाउे, वाय. आशा राव, मिनाक्षी महापात्रा, वीणा कावळे, निधी व्यास, वर्षा सतदेवे, विकास पटले, रूपकला रहांगडाले, प्रमोद वाडी, राहुल रामटेके, दिव्यांशु बावनकर, अफ्रिन शेख, महेंद्र हरिणखेडे, लिंटा शरणागतसह आदींनी अभिनंदन केले.




