30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा!-जि.प. अध्यक्ष मडावी

स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा!-जि.प. अध्यक्ष मडावी

0
25

गोंदिया,दि.21 : स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१९ ही मोहिम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या बाबतील नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्वाचा असून स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीणमध्ये अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन जिप अध्यक्षा सीमा मडावी यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१९ चा शुभारंभ केला आहे. संपूर्ण देशात स्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यांचा गुणानुक्रम ठरविण्याचे सर्व्हेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या सर्व्हेक्षणातून गावांतील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराच्या ठिकाणांतील थेट निरीक्षण, स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामस्थांचा अभिप्राय तथा केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरील जिल्ह्याच्या माहितीवरुन जिल्ह्याची क्रमवारी निश्‍चित करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना सर्व्हेक्षणात सहभागी करुन घेण्याचे सुध्दा शासनाचेधोरण आहे. यातंर्गत जिल्ह्याच्या १३ लक्ष लोकसंख्येपैकी साधारणत: २ लक्ष अभिप्राय नोंदविण्याचे गोंदिया जिल्ह्याचे लक्ष आहे. त्यासाठी गावकरी, बचत गटांच्या महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, युवक व गावकर्‍यांनी स्वच्छ सर्व्हेक्षणातून अभिप्राय नोंदवून इतरांना सुध्दा अभिप्राय नोंदविण्यास सांगावे. देशपातळीवर आपले मत विचारात घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकांचा सहभाग गरजेचा असून नागरिकांनी स्वच्छ सर्व्हेक्षण अँपवर अभिप्राय नोंदवून जिल्ह्याचा नावलौकीक वाढविण्याचे आवाहन जिप अध्यक्षा मडावी यांनी केले आहे.

जिल्ह्यासाठी केवळ पाच मिनिटे
प्ले-स्टोर मध्ये टाईप करुन अँप इंस्टाल करा. त्यानंतर राज्य महाराष्ट्र, जिल्हा गोंदिया व भाषा मराठी निवडा, पुढे आपणास स्वच्छतेच्या बाबतीत चार प्रश्न विचारले जातील. त्याचे योग्य उत्तर नोंदवून अभिप्राय नोंदविता येतो. याशिवाय १८00५७२0११२ या टोल फ्री क्रमांकावर सुध्दा अभिप्राय नोंदविता येईल. या सर्व प्रक्रियेला केवळ पाच मिनिटांचा वेळ लागतो.