33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ जि.प.सदस्य परशुरामकरांच्या स्थानिक विकास निधीतून खजरीत उभारले वाचनालय

जि.प.सदस्य परशुरामकरांच्या स्थानिक विकास निधीतून खजरीत उभारले वाचनालय

0
37

सडक अर्जुनी,दि.22ः-सध्याचे युग संगणकाचे आहे.प्रचलीत शासकीय धोरणानुसार,भविष्यात स्थिर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे.त्याची पुर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षा तयारी साठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते.यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले.ते 18 सप्टेंबरला आयोजित भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय खजरी/डों.च्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी अंतर्गत हे वाचनालय ‘ जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आले आहे.अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्था साकोलीचे सचिव एन.एन.येळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सडक अर्जूनी पंचायत समीतीचे उपसभापती राजेश कठाणे,जि.प.च्या माजी उपाध्यक्षा छायाताई चौव्हाण,भंडारा जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे ,खजरी ग्राम पंचायत सरपंच सत्यशीला गायकवाड, प्राचार्य खुशाल कटरे,उपसरपंच नरेंद्र देहारी,पर्यवेक्षक आर.के.कटरे,उमावि प्रभारी प्रा.योगराज परशुरामकर माजी उपसरपंच उमराव मांढरे,सर्व शालेय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले.संचालन जि.टी.लंजे व आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्विते साठी डी.डी.रंहागडाले,सी.एस.ब्राम्हणकर,प्रा.सुरज रामटेके,ए.डी.मेश्राम,कु.व्हि.एस.राठोड,आर.यु.गौतम यांनी परीश्रम घेतले.

blank