30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home मराठवाडा/खान्देश म्हैसाळ योजनेपासून वंचित शेतकरी घालणार विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार

म्हैसाळ योजनेपासून वंचित शेतकरी घालणार विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार

0
55

संख(राजेभक्षर जमादार),दि.२१ःः येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा की नाही या विषयाला घेऊन जत तालुक्यातील संख येथे म्हैसाळ योजनेपासून वंचित गावांचा शेतकरी मेळावा पार पडला.या मेळाव्यात शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्वसम्मतीने घेण्यात आला. आयोजित करण्यात आसला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकाराम महाराज होते. यावेळी पाणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.तुकाराम महाराज यांनी सुरु केलेल्या पाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.पूर्व भागातील योजनेपासून 64 गावे वंचित आहेत या गावांचा समावेश या योजनेमध्ये करावा याकरता गेली 40 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु राज्यकर्त्यांनी या योजनेचे पाणी आणू असे आश्वासन देऊन निवडणूक जिंकल्या. परंतु हे गाव मात्र वंचित राहीले,त्याकरिता हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

प्रास्ताविक व्यंकटेश जोशो यांनी केले.या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी संघटनेचे राजेंद्र पुजारी,व्यंकटेश जोशी, चंद्रशेखर रेबगोंड, भीमाशंकर बिरादार, विश्‍वनाथ बिराजदार,दरीबडची ग्रामपंचायत सदस्य  अमोगसिध्द शेंडगे, माजी पंचायत समिती सदस्य भैरप्पा माळी, रमेश कनमडी, गिरिष कुंभार, सोपान कुंभार यांनी पाणी मिळाल्याशिवाय मतदान करायचे नाही असे मनोगत व्यक्त केले.    यावेळी ह.भ.प. तुकाराम महाराज म्हणाले की म्हैसाळ योजनेमध्ये जत सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील 70 गावांचा समावेश आहे.  या गावासाठी कृष्णा पाणी तंटा नुसार 17:44 इतके पाणी शिल्लक असून या पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पूर्वभागातील वंचित 64 गावासाठी पाणी शिल्लक नाही. मग पाणी शिल्लक नसताना पाणी देण्याचे आश्वासन देणारे राज्यकर्ते पाणी कुठून देणार ? असा सवाल त्यांनी व्यक्त केला.तालुक्यातील वंचित 64 गावांना म्हैसाळ योजनेतील पाणी जर मिळायचे असेल तर यासाठी कर्नाटक आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्याचा असणारा कृष्णाला वादा तंटा करार झाला तरी पाणी येऊ शकते नाहीतर नाही यासाठी या मोठा संघर्ष करावा लागेल. निवडणुकी पुरता बहिष्कार न घालता मोर्चा,  उपोषण, आत्मदहन यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे मत व्यक्त केले. यावेळी दरीबडची लमाणतांडा (दरीबडची),खंडनाळ बोर्गी तिकोंडी अंकलगी सोरडी मोटेवाडी धुळकरवाडी,भिवर्गी जालिहाळ बुद्रक, माणिकनाळ, गोंधळेवाडी सोन्याळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आभार भीमाशंकर बिराजदार यांनी मानले.