गोंदिया,दि.22 : विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेत बदल करण्यात आला असून राम अरुण लंजे यांनी उपविभागीय अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला आहे. राम लंके हे यापूर्वी प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.म. अमरावती येथे कार्यरत होते. पदोन्नतीने ते गोंदिया येथे उपविभागीय अधिकारी या पदावर रूजू झाले आहेत. त्यांचे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश भांडारकर, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार शिंगाडे, पाटील, पालांदूरकर व महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्ह्याचे सचिव आशिष रामटेके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..




