30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ‘स्वीप’समितीकडून मतदार जनजागृती;नव्याने मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन

‘स्वीप’समितीकडून मतदार जनजागृती;नव्याने मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन

0
28

गडचिरोली,दि.-२३: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाच्या अनुषंगाने विविध विभागांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवून मतदान जनजागृती केली जाते. त्या अनुषंगाने आज शासकीय आदिवासी मुलांचे वश्रसतीगृह येथे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदूराणी झाखड यांच्या उपस्थितीत युवकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे-निळ, स्वीप समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.
यावेळी आदिवासी वस्तीगृहातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदान करण्याचे आवाहन डॉ. इंदूराणी झाखड यांनी केले. ज्या तरुणांची नावे अद्याप मतदार यादीत नाहीत त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी त्याच ठिकाणी फॉर्म ६ पण भरून घेण्यात येत होता. मतदान प्रक्रियेदरम्यान लोकांच्यात जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार सहभाग व मतदान जनजागृती बाबत समिती जिल्हास्तरावर नेमली जाते, यालाच स्वीप समिती असे म्हणतात. याचे प्रमुख जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह आहेत. या समितीमार्फत निवडणूक काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध विभागांमार्फत मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.