सडक अर्जुनी,दि.24ः- बहुजन हिताय जगत कर्मचारी सहकारी पतसंस्था खजरी/डोंगरगावची आमसभा आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान उच्चमाध्यमिक विद्यालय खजरीच्या सभागृहात पार पडली.या आमसभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य खुशाल कटरे होते.यावेळी सर्वानूमते सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.त्यामध्ये आर्थिक वर्ष 2018-2019 चा जमाखर्च-मंजूर.आर्थिक वर्ष 2018-2019 चे अंकेक्षण अहवाल मंजूर करण्यात आले.1 ऑक्टोबर 2019 पासून नियमित व आकस्मिक कर्ज शेकडा 12.50 व्याज दराने प्राप्त होईल.मुदती ठेवीवर जास्तीत जास्त शेकडा 11 व्याज दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.आकस्मिक कर्ज मर्यादा तिस हजार रू.पर्यंत करण्यास मंजुरी.आर्थिक वर्ष 2019-2020 चे लेखापरीक्षण करण्यासाठी CAराजेश चतुर यांची नियुक्ती करण्यास आमसभेने मंजुरी दिली.पतसंस्थेची कमाल भागभांडवल क्षमता संध्या 2 कोटी व प्रती सभासद 2 लाख आहे,यात वाढ करण्यावर लक्ष देण्याचे ठरले.पतसंस्थेची स्वतःची इमारत उभी करण्यात येईल.या साठी बॅकेत बांधकाम खाते उघडण्यात येईल ,त्या मार्फत बांधकाम निधी स्वतंत्ररित्या उभा करण्यास मंजुरी देण्यात आली.सभासदांना आर्थिक वर्ष 2018-2019 चा लाभांष शेकडा 12 ने देण्याची मागणी करण्यात आली.त्यापैकी शेकडा 9,नकद व शेकडा 3,भाग भांडवलात वळविण्यावर चर्चा सकारात्मक झाली.अहवाल वाचन पत संस्था सल्लागारसमितीचे सचिव एन.एन.येळे यांनी केले.संचालन जी.टी.लंजे यांनी व आभार उल्हास तागडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्विते साठी व्यवस्थापक उमराव मांढरे ,लिपिक सुभाष कवरे यांनी परिश्रम घेतले.




