30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुण आत्मसात करावे-नगरसेवक प्रमोद पिपरे

विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुण आत्मसात करावे-नगरसेवक प्रमोद पिपरे

0
30
गडचिरोली,दि.24 – विद्यार्थ्यांनी आयुष्यात उत्तुंग शिखर ज्ञान, चारित्र्य व एकता या अभाविपच्या ब्रिद वाक्याप्रमाणे गाठावे. स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यांचा अभ्यास केला तर आपल्याला यशस्वी होणे कठीण जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुण आत्मसात करावे, असे प्रतिपादन नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा गडचिरोली जिल्हा अभ्यासवर्ग तालुक्यातील नवेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक प्रमोद पिपरे बोलत होते. अभाविपच्या अभ्यासवर्गाचे उद्घाटन नगरसेवक तथा अभाविपचे पूर्व पदाधिकारी प्रमोद पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभाविप विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा.येनारकर, अभाविप शहराध्यक्ष पंढरी वाघ, शहर संयोजक अंकुश कुनघाडकर, अभाविप जिल्हा विस्तारक अक्षय राजुरकर, प्रा.शिवणकर, प्रा.मुन्घाटे, सहनगर मंत्री हर्षा भांडेकर, नगरमंत्री शिवकुमार गंगुम्मवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभाविपच्या गडचिरोली जिल्हा अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन पुष्पक भुरे तर आभार चंचल रोहतकर यांनी मानले. यावेळी अभ्यासवर्गाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.