
गोंदिया,दि.24-भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाड़ीच्यावतीने विधानसभा निवडणुकीला घेऊन येत्या गुरुवार २६ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता भवभूती रंगमंदिर रेलटोली गोंदिया येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश देशभ्रतार हे राहणार असून मुख्य अतिथी म्हणून महासचिव कुशल मेश्राम, वंचित बहुजन आघाड़ीचे विदर्भ प्रमुख राजेंद्र महाडोळे,उपाध्यक्ष धनराज वंजारी,भारिप नेते राजुभाऊ लोखंडे,जनार्दन बनकर,शमशुल पठाण,सतिश बनसोड,सुरेंद्र खोब्रागडे,विलास राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला भारिप बहुजन महासंघ,वंचित बहुजन आघाड़ी,सम्यक विद्यार्थी आंदोलन,समता सैनिक दल,भारतीय बौध्द महासभेच्या समस्त पदाधिकारी, कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यांनी आवर्जून जास्तीत जास्त संखेनि उपस्थित राहावे.




