27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय शुक्रवारला गोंदिया जिल्हा काँग्रेसची सभा

शुक्रवारला गोंदिया जिल्हा काँग्रेसची सभा

0
29

गोंदिया,दि.२४ः-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने गोंदिया जिल्ह्यात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी २७ सप्टेंबरला येथील शहिद भोला काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वराडे यांनी दिली आहे.याच सभेत जंयती उत्सवाच्या नियोजनासोबतच जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या संबधाने राजकिय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे.त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरसेवकांसह सर्वच काँग्रेसजणांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.