
गोंदिया,दि.25ः- विधानसभा निवडणुकांना लक्षात घेत गोंदियाचे उपविभागीय अधिकारी यांची बदली झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने अखेर आपल्या कार्यप्रणालीतील चुकांना पुर्णविराम देत भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक उपजिल्हाधिकारी सौ.वंदना सावरंगपते यांची गोंदिया उपविभागीय अधिकारी गोंदिया बदली केली.त्यानुसार सौ.सावरंगपते यांनी आज(दि.25)गोंदिया उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला.पदभार स्विकारल्यानंतर गोंदिया उपविभागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तसेच कार्यालयातील कर्मचारी वर्गांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी मंडळ अधिकारी पी.बी.तिवारी,मंडळ अधिकारी एन.बी.वर्मा,अशोक आडे,सुनिल राठोड,श्री.भेंडारकर,ममता ठकरले, पी.बी. ठाकरे, डी.एस. मडावी, अमित बडोले, दिपक नगदेवे, सुनिल गणविर,श्री.भगत,हटवार,ठाकरे,तलाठी जी.आर.भोयर,तलाठी सुनिल राठोड,मोरे,निमजे,पतेहरी आदी मान्यवर उपस्थित होते




