30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ पंचायत समिती समोरील प्रांगणात चिखलाचे साम्राज्य

पंचायत समिती समोरील प्रांगणात चिखलाचे साम्राज्य

0
31

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.25ः-अर्जुनी मोरगाव पंचायत समिती समोर मोठे प्रांगण आहे.त्या प्रांगणामध्ये मात्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या या प्रांगणातून पोलीस स्टेशन, पंचायत समिती ,बालविकास प्रकल्प कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे.मात्र साचलेला पाणी व्यवस्थित नाल्यामध्ये जाण्याची सोय नसल्याने आणि पटांगणाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने पावसामुळे या प्रांगणात नेहमीच चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने अधिकारी,कर्माचारीसह नागरिकांनाही त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.  दरवर्षी आनंद मेला सुद्धा भरविण्यासाठी हा प्रांगण किरायाने उपलब्ध करून दिला जातो. मात्र या प्रांगणात पाहिजे त्या प्रमाणात मुरूम न टाकल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. ज्या ठिकाणाहून दुचाकी चार चाकी वाहने जातात त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाणी साचले आहे. हे खड्डे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच या कार्यालयाकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण करावे अशीही मागणी समोर आली आहे.