25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय ९ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

९ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
31

वाशिमदि. २५ :  जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून ८ ऑक्टोंबर रोजी दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच ९ ते ११ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान नवदुर्गा विसर्जननिमित्त शहरी व ग्रामीण भागात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू केला आहे.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,  व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, सामाजिक सण, लग्न सोहळे, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे, रंगमंच, विभिन्न भागामध्ये निश्चित दिवस ठरवून दिलेले आठवडी बाजार आदी ठिकाणी हा आदेश लागू राहणार नाही. उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.