26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ पोलीस नक्षल चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त

पोलीस नक्षल चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त

0
44

गडचिरोली : जिल्ह्यात येत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड उपविभागातंर्गत येणाऱ्या पोमके कोठी हद्दीतील मौजा कोपर्शी जंगल परिसरात काल दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सी ६० दलाचे पोलीस कमांडो जंगलात गस्त करत असतांना पोलीस – नक्षल चकमक झाली. पोलीसांकडून जोरदार प्रतिउत्तर मिळताच नक्षलांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत तिथुन पळ काढला. यानंतर सी. ६० दलाच्या पोलीसांनी घटनास्थळी शोध मोहीम राबविली असता मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य मिळून आले. यात दोन बरमाल, एक ट्रेलबोर, एक ८ एमएम शस्त्रांसह दैनंदिनी उपयोगात येणारे साहित्य सापडले आहे. प्राप्त महतीनुसार या चकमकीत काही नक्षल जखमी झाल्याचेही पोलीसांनी सांगितले आहे.