25.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा

निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा

0
22

वाशिम, दि. २8 :  भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी आज जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांकारिता निवडणूक खर्च संनियंत्रणसाठी करण्यात आलेली पूर्वतयारीचा आढावा घेतला. या अनुषंगाने त्यांनी वाशिम शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक खर्च संनियंत्रण समिती सदस्य, सहाय्यक खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा केली.

यावेळी निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, अपर जिल्हा कोषागार अधिकारी श्याम गाभणे, सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख, एम. व्ही. तायडे, एन. जी. मसरे, श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी एस. एच. कंदेवार आदी उपस्थित होते.

श्री. सिंग म्हणाले, निवडणूक काळात उमेदवारांकडून होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद त्यांच्या शॅडो रजिस्टरमध्ये होणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक काळात प्रलोभनासाठी पैसा, मद्य याचा वापर होवू नये, यासाठी सर्व फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्यांनी लक्षपूर्वक काम करावे. निवडणूक खर्च संनियंत्रण विषयी कोणतीही समस्या असल्यास कधीही संपर्क साधावा. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विहित नमुन्यातील अहवाल निश्चित कालावधीत पाठविले जातील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.