25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ विधानसभा निवडणूक २०१९ साठी पहिल्या दिवशी २ अर्ज दाखल

विधानसभा निवडणूक २०१९ साठी पहिल्या दिवशी २ अर्ज दाखल

0
34

गडचिरोली, दि. २8: गडचिरोली विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने  तीन विधानसभा क्षेत्र गडचिरोली, आरमोरी, अहेरी या मतदार संघासाठी  एकूण ५४ अर्ज विक्री झाले. त्यापैंकी सर्वांत जास्त फॉर्म विक्री ही आरमोरी मतदार संघात झाली असून २७ फॉर्म विक्री करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली क्षेत्रातून फॉर्म विक्री २२ तर अहेरी विधानसभा क्षेत्रात ५ अर्ज विक्री करण्यात आले. त्यापैंकी दोन वेगवेगळया मतदार संघात २ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. १ अर्ज आरमोरी क्षेत्रातून बालकृष्ण श्रीराम सडमाके, बहुजन समाज पार्टी यांनी दाखल केले तर अहेरी क्षेत्रातून आत्राम अजय मलय्या यांनी नामनिर्देशन दाखल केले. तर गडचिरोलीमध्ये एकही नामनिर्देशन फॉर्म दाखल झाले नाही.