गोंदिया,दि.28ः-राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून , २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या दिवशी ४९ जणांनी नामनिर्देशनपत्रांची उचल केली.राज्यासह जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, २४ ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून मतदारांचे लक्ष कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देतो याकडे लागले आहे. शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून नामनिर्देशपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या दिवशी एकूण ४९ नामनिर्देशनपत्र उचल झाली आहे.यात गोंदिया विधानसभा क्षेत्रात १७, तिरोडा विधानसभा क्षेत्रात १२ अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात १७ व आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात ३ यांनी नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली आहे.
भंडारा- विधानसभा निवडणुकीच्या नामांकनाला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी तुमसर, भंडारा, साकोली, विधानसभा क्षेत्रात ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली आहे. यामध्ये तुमसर १२ उमेदवार ४२ नामनिर्देशनपत्र, भंडारा २६ उमेदवार ६0 नामनिर्देशनपत्र तर साकोली १0 उमेदवार १४ नामनिर्देशनपत्र यांचा समावेश आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये १२ उमेदवारांना ४२ नामनिर्देशनपत्र उचल करण्यात आली आहे. प्रत्येकी १0 उमेदवारांनी ४ याप्रमाणे ४0 नामनिर्देशनपत्र घेतली आहे तर २ उमेदवारांनी प्रत्येकी १ नामनिर्देशन पत्र स्विकारुन तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेकरीता उमेदवार म्हणून तयारी दर्शविली आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये २६ उमेदवारांकरीता ६0 नामनिर्देशनपत्र स्वीकारलेली आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना, भारतीय कॅम्युनिष्ठ पार्टी, बहुजन समाज पार्टी, पिपल्स रिपब्लीकन पार्टी व अपक्ष यांचा समावेश आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये १0 उमेदवारांकरीता १४ नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली. प्रत्येकी तीन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी दोन या प्रमाणे तर उर्वरित ८ उमेदवारांनी प्रत्येकी १ याप्रमाणे असे एकूण १४ नामनिर्देशपत्र उचल करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी व अपक्षांचा समावेश आहे. तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशन पत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर व साकोली यांच्या स्तरावरुन दुपारी ३ वाजेपयर्ंत वितरित करण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारांचा नामनिर्देशनपत्र दाखल झालेला नाही.





