26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ खामतलाव येथे महिलासांठी कार्यशाळा

खामतलाव येथे महिलासांठी कार्यशाळा

0
29

देवरी, दि.२८:नागझिरा नवेगावबफर झोनतंर्गत येत असलेल्या गावांच्या नागरिकाना ग्रामीण जिवन्नोत्ती कार्यक्रमांतर्गंत देवरी तालुक्यातील  खामतलाव येथे भारतीय वन्यजीव न्यास अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये वनसवर्धंन वन्यजीव संरक्षंण व ग्रामीण जिवोन्नती बचत गटाच्या महिलांना व्यवसायबद्दल माहिती तसेच आपल्या बचत गटाव्दारे जे पण पदार्थ तयार केले जातात त्याची पॅकेजिंक करुन विक्री कशी करायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विदर्भ व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बचत गटाच्या महिलांच्यावतीने शाश्वत पद्धतीने विभिन्न वस्तू तयार केले जातात.जंगल तोड कमी करण्यासाटी उन्नत चुल्हा, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे याबद्दलची माहिती देण्यात आली.कार्यशाळेलाध्ये जि.सी.ठवरे(क्षेत्र सहायक, मुल्ला),एस.एच.वनकर(वनरक्षक, खामतलाव), आर.जी.मडावी(वनमजूर, झुन्जारीटोला)  गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी व ब्रम्हपुरी तालुक्यातील १३ गावातील १७ बचत गट आणि भारतीय वन्यजीव न्यासचे विभोर चौधरी, हिवराज राऊत, नितिन रावते, धनराज जुमनाके, नूर अली व जितेंद्र कटरे उपस्थित होते.