30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ निवडणुक निरिक्षक घोष यांची अहेरीमध्ये अचानक भेट

निवडणुक निरिक्षक घोष यांची अहेरीमध्ये अचानक भेट

0
27

निवडणुकी दरम्यानच्या तयारीबाबत व्यक्त केले समाधान
गडचिरोली ,दि.२९ः: अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली असून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवरा घोष निवडणुक निरिक्षक (खर्च) यांनी अचानक भेट दिली यावेळी विविध कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. निवडणुक प्रक्रियेतील विविध उपाययोजनांबाबत नेमलेल्या पथकांना मार्गदर्शन व यापूर्वी केलेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी दि. २९ सप्टेंबर रोजी घेतला. यावेळी त्यांनी विविध पथकांनी जास्तीत जास्त निगरानी, गस्त घालून निवडणुकी दरम्यान होणारे गैरप्रकार, पैशाचा वापर, मद्य तसेच इतर आमिषे यांचेवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना काही तक्रारी अथवा सुचना असल्यास त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर (८२७५२३७१५५) संपर्क साधता येईल असे सांगितले. यावेळी सुधाकर कुळमेथे, अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली / अहेरी यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष कार्यवाही करताना वापरायच्या कायदेशीर तरतूदी व त्याअनुषंगाने तयार करावयाचा अभिलेख याबाबत मार्गदर्शन केले. सोबत तायडे, सहाय्यक निवडणुक निरिक्षक(८३५६०८६२४८) उपस्थित होते. या सभेस अहेरी विधानसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी, तहसिलदार अहेरी सुभाष यादव, तहसिलदार एटापल्ली कैलास अंडील, तहसिलदार भामरागड रमेश जसवंत, तहसिलदार सिरोंचा कपिल हाटकर, तहसिलदार मुलचेरा उपस्थित होते.
मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी ‘मतदार मदत केंद्र‘ हे उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्या कार्यालयात सुरु करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी आपली नावे मतदार यादीत पडताळावीत तसेच याबाबत अडचणी असल्यास टोल फ्री क्रमांक १९५० देखील जिल्हास्तरावरुन उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा वापर करावा असे आवाहन यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले. नागरीकांना आचारसंहिता भंग तसेच निवडणुकीचे अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याकरीता विशेष तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात आला असून ०७१३३-२७२५०० या क्रमांकावर संपर्क करता येईल. तसेच ऑनलाईन तक्रार दाखल करावयाची असल्यास लतखॠखङ(सी-व्हीजील) हे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याअंतर्गत आचारसंहिता भंगाची तक्रार व फोटो दाखल करता येईल. सदरहू तक्रार दाखल होताच त्यावर १०० मिनीटात चौकशीची कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवारांना तसेच त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना विविध परवाणग्या जसे वाहन, प्रचार सभा, रॅली. रोड शो, मिरवणुक याबाबत मिळण्यासाठी एक खिडकी योजना अंतर्गत सुविधा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या ठिकाणी ऑनलाईन तसेच ऑफलाईन परवानगी अर्ज स्विकारण्यात येतील. त्याबाबत आवश्यक कागदपत्रांची माहिती सुविधा कक्ष व अहेरी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे असे ते म्हणाले.