30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ 21 हजाराच्या दारूसह होंडा एक्टिवा जप्त

21 हजाराच्या दारूसह होंडा एक्टिवा जप्त

0
42

अर्जुनी मोरगाव,दि.29(संतोष रोकडे)ः-सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागू झाली असून निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व दारूबंदी असलेल्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.त्यातंर्गतच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर येथे गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागत असल्याने त्याठिकाणी तपासणी नाका बसविण्यात आला आहे.दरम्यान या नाक्याजवळून आज 29 सप्टेंबरला अर्जुनी मोरगावचे ठाणेदार महादेव तोदले यांना होंडा ॲक्टिवा दुचाकीने (एमएच mh33 एक्स 81 3 3) जात असलेल्या इसमावर शंका आल्याने त्या दुचाकीचा पाठलाग केला अज्ञात आरोपी दारू वाहतूक करताना आढळून आला. दरम्यान आरोपी दुचाकी सोडून पसार होण्यात यशस्वी झाला असून 21 हजाराच्या दारूसह तीस हजाराची एक्टिवा गाडी असा असा एकूण 51 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई करताना ठाणेदार महादेव तोडले, पोलीस हवालदार निकोडे, ग्रामसेवक पोटावी व तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी केली.