34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय वंचितचे भंडारा-गोंदियातील उमेदवार जाहीर

वंचितचे भंडारा-गोंदियातील उमेदवार जाहीर

0
43

गोंदिया.दि.30- वंचित बहुजन आघाडीची राज्य विधानसभेच्या निवडणुकीची दुसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पाच मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे.

एमआयएमशी फारकत घेत वंचितने कुरघोडी करीत उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील एकूण जागांपैकी 180 उमेदवार घोषित करून आपली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 60- तुमसर मतदार संघातून विजय शहारे, 61- भंडारा मतदार संघातून एड. नितीन  बोरकर, 63- अर्जूनीमोर मतदार संघातून  रीता लांजेवार, 64- तिरोडा मतदार संघातून संदीप राजकुमार पोगामे तर 66- आमगाव-देवरी मतदार संघातून सुभाष रामरामे यांच्या नावाचा समावेश आहे.रामरामे हे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी आहेत.

blank