लाखनी,दि.30ः-सृष्टी नेचर क्लब लाखनीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात लाखनी नगरीत साजरा केला जातो. या महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेच्या शुभपर्वावर सायकल मॅरेथॉनने करण्यात आली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील स्पर्धकांसह पूर्व विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते.
याप्रसंगी अर्पित गुप्ता, प्रशांत खेडीकर, संदीप भिवगडे, निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, पप्पू गिरेपुंजे, दत्ता गिरेपुंजे, कांचन कावळे, मयूर भांडारकर, आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवत स्पर्धा सुरू केली. मुलींसाठी पाच किमी तर मुलांसाठी 24 किमी अंतर असलेली ही सायकल मॅरेथॉन समर्थ मैदान लाखनी येथून सुरू झाली आणि केसलवाडा रोड येथे पोहोचली. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. मुलींच्या गटात अनुक्रमे कल्याणी धरमसारे, नेहा नेवारे, कोमल धुर्वे, स्वाती पाखमोडे, पूजा धरमसारे यांनी क्रमांक पटकावला तर गेयर सायकल मध्ये हर्षल शेंडे, राम पोंडे, राज पाखमोडे, भूषण निखाडे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला तर गेयर सायकल कार्यक्रमामध्ये गुलाब धोटे, गौरव डोंबरे, अजय गिरेपुंजे, मयूर निर्वाण, नरुल हक, राजकुमार नंदेश्वर, पियुष पडोळे, सागर परतेकी, यश गिदमारे, राधेश्याम हिंगोले यांनी क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण समर्थ मैदान येथे पार पडले. यावेळी डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या हस्ते तसेच शिल्पी गुप्ता, अंजली खेडीकर, निशिकांत वैद्य, पितांबर क्षिरसागर, भोला सचदेव, दिपक देशमुख, कुणाल निखाडे, महेश गुरुणानी, विजय गुरुणानी, रितेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आणि आयोजनासाठी स्थानिक प्रशासनासह पोलिस प्रशासन व स्व. हिरामणजी निंबार्ते ट्रस्ट, निंबार्ते जेनेरिक मेडिसिन आणि सृष्टी नेचर क्लबच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.




