Ø आदर्श आचारसंहिता सुरु होताच जिल्हा प्रशासनाची कडक कार्यवाही
भंडारा,दि. 1 :- 21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये या करीता जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तीनही क्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी ठिकाणावर लावण्यात आलेली 5 हजार 702 होर्डिंग, बॅनर, पाम्लेट, पोस्टर्स हटविली आहेत. तर 3 लाख 60 हजार 990 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आली आहे. 164 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आले असून 182 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हयात आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये याकरीता उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर खबरदारी घेतल्या जात आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स 24,48 व 72 तासाच्या आत हटविण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तुमसर क्षेत्रातील सर्वाधिक 2811, साकोली 1054 तर भंडारा 1837 असे 5702 होर्डिग, बॅनर व पोस्टर्स हटविण्यात आले. तर 6 लाख 60 हजार 990 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. 174 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आले असून 182 जणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्हयात आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये या करीता तीनही क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर पथक तैनात करण्यात आले आहे.
आचार संहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे शासकीय सार्वजनिक, खाजगी ठिकाणी होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स लावण्यावर मनाई करण्यात आली आहे. शासकीय परिसरात लावण्यात आलेले 24 तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले 48 तास तर खाजगी ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स 72 तासात हटविण्यात यावे, असे सख्त निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या निर्देशांन्वये जिल्हयातील तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. हटविण्यात आलेले जागेवरील फलक पुर्ववत लावण्यात येणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.




