शेतकèयांचे व नागरिकांचे तहसीलदार यांना निवेदन
अर्जुनी मोरगाव,दि.०१ः- येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खोदा बंदिया, वडेगाव,पुष्पनगर(अ),पुष्पनगर(ब) येथील शेतकèयांनी आपल्या विविध मागण्यांच्या निवेदनासह तहसिलदाराकंडे आज १ ऑक्टोंबरला दिला आहे.निवेदनात गाढवी नदीच्या तीरावर आमची गावे वसलेली असून शेतातील पिकाचे उत्पादन घेण्याकरीता विजेचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने कृषी पंपाचा पुरवठा असतानाही उत्पादन मिळत नाही,त्याकरीता २४ तास वीज पुरवठा करण्यात यावे.गाढवी नदीच्या किनारी गाव व शेती असल्याने पुरामुळे नेहमीच पिकाचे व घरांचे नुकसान होत असल्याचेही म्हटले आहे.केशोरी ते गडचिरोली पर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करुन देण्यात यावे तसेच २४ तास विजपुरवठयाची सोय करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व ग्रामवासी निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी खोडदा येथील रूपचंद बाळबुद्धे,वडगाव बंड्याचे उपसरपंच भोजराम निमकर, प्रधान सरकार,दिलीप सील व संबंधित गावातील शेतकरी उपस्थित होते.




