- 33 उमेदवारांनी केली 74 नामनिर्देशन पत्राची उचल
गोंदिया दि.1 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करीता आज जिल्हयात नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये गोंदिया विधानसभा मतदार संघाकरीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोपालदास अग्रवाल, अपक्ष अतुल हलमारे यांनी दोन अर्ज, प्रदीप वासनिक यांनी अपक्ष म्हणून, तिरोडा विधानसभा मतदासंघातून अपक्ष म्हणून राजेशकुमार तायवाडे, राजेंद्र बोंदरे या उमेदवाराचा समावेश आहे. जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघात 5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्र, तिरोडा विधानसभा मतदासंघातून 13 उमेदवारांनी 21 नामनिर्देशनपत्र, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून 12 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र तर आमगांव विधानसभा मतदारसंघातून 3 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्र अशा एकूण 33 उमेदवारांनी 74 नामनिर्देशनपत्राची 1 ऑक्टोबर रोजी उचल केली.




